काजोलच्या वाढदिवशी पती अजय देवगणच्या हटके अंदाजात शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलीवूड मध्ये आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री काजोलचा आज वाढदिवस आहे. काजोलच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. परंतु तिचा पती आणि अभिनेता अजय देवगण याने तिला हटके अंदाजात दिलेल्या शुभेच्छा चर्चेत आहेत.

अजय देवगणच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ पोस्ट करत काजोलला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये सुरुवातीला काजोलचा इनकमिंग कॉल दिसत आहे. फोन उचलल्यानंतर अचानक समोर काजोलचे फोटो येतात. या फोटोंमध्ये काजोलने लाल रंगाचा वन पिस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. ‘जेव्हा तिचा फोन येतो तेव्हा मी कधीच उचलायला चुकत नाही. काजोल तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा’ या आशयाचे कॅप्शन अजय देवगण याने यावेळी दिले आहे.

https://www.instagram.com/reel/Cg2QNlloCWp/?utm_source=ig_embed&ig_rid=e33046ea-eb69-47bf-a0a2-8349536e1f5e

दरम्यान, या व्हिडिओला आतापर्यंत 4 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर अजयच्या या पोस्टवर नेटकऱ्यानी भन्नाट कमेंट करत त्याची फिरकी घेतलेली पाहायला मिळत आहे. एका यूजरने लिहिले आहे की, ‘सर जी, याला बायकोची भीती म्हणतात’. दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, ‘होय कारण जर तुम्ही फोन उचलला नाही तर तुमची बायको रागावेल.