हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अजिंक्य रहाणे उर्वरित आयपीएल आणि इंग्लंड कसोटी दौऱ्यातून बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल सामन्यांना मुकणार आहे. रहाणे (Ajinkya Rahane) जुलैमध्ये बर्मिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध होणार्‍या स्वतंत्र कसोटी सामन्यालादेखील मुकणार आहे. अजिंक्य रहाणेला या दुखापतीमधून बरे होण्यासाठी चार आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे.

शनिवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर केकेआर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या सामन्यात त्याला हि दुखापत झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आज संध्याकाळी तो केकेआरच्या बायोबबलमधून बाहेर पडणार आहे. अजिंक्य रहाणेला यंदाच्या आयपीएलमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने 7 सामन्यात फक्त 133 धावा केल्या आहेत.

आयपीएलच्या महत्वाच्या टप्प्यात अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) दुखापतीमुळे बाहेर पडल्याने केकेआरला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता केकेआर त्याच्या जागी कोणाला संधी देते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. केकेआरने आतापर्यंत 13 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत तर 7 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामुळे ते गुणतालिकेत 12 पॉईंटसह 6 व्या क्रमांकावर आहे.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं

Leave a Comment