हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सहकारी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी (Maharashtra state co cooperative bank scam) उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांच्यासह इतर संचालकांना क्लीन चिट मिळली आहे. फेब्रुवारी २०२० मध्ये निवृत्त जिल्हा न्यायाधीश पंडितराव जाधव यांच्या चौकशी समितीने या संचालकांना क्लीनचिट दिली आहे. सहकार आयुक्तांना समितीने अहवाल सादर केला, त्यातून ही माहिती समोर आली.
25 हजार कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याच्या चौकशी अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेने तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त केले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावं होती.
सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांच्यासह 70 जणांवर कलम 420, 506, 409, 465 आणि कलम 467 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. विशेष म्हणजे या गुन्हा दाखल झालेल्या नेत्यांमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भाजपात असलेले विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांची नावं होती.
समितीच्या अहवालात तत्कालिन संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला होता. सन २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेने देखील हे मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला होता.निवृत्त न्यायाधीश राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत म्हटले होते. त्यानंतर चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीचा चौकशी अहवाल सरकार आयुक्तांकडे सादर करण्यात आला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’