हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | एकीकडे देशात कोरोनाने हाहाकार माजावलेला असताना शिवाप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत असे धक्कादायक विधान केलं होते. आता याच विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी भिडे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.
भिडे यांनी यापूर्वी बागेतल्या आंब्या बाबत विधान केले होते. आता केलेले विधान म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि असा प्रकार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटले आहे. भिडे यांचे वक्तव्य तपासून कारवाईचा निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पावर यांनी पंढरपूर येथे बोलताना स्पष्ट केले आहे.
काय म्हणले होते संभाजी भिडे
करोनामुळे मरणारी माणसं जगायच्या लायकीची नाहीत असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले. करोना हा रोग नसून, करोनाने मरणारी लोकं जगण्याच्या लायकीची नाहीत असं ते म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी करोना निर्बंधावरुनही टीका केली. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते.
मुळात करोना हा रोग नाही. करोनाने माणसं मरतात ती जगण्याच्या लायकीची नाहीत. करोना हा रोग नाही. हा मानसिक रोग आहे. यामुळे काही होत नाही,” असं संभाजी भिडेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी निर्बंधांवरुन टीका करताना म्हटलं की, “दारुची दुकानं उघडी…त्यांना परवानगी दिली आहे. पण कोणी काही विकत बसला आहे त्याला पोलीस काठ्या मारतात. काय चावटपणा चालला आहे. हा नालायकपणा, मूर्खपणा चालला आहे”. असे वक्तव्य केले होते.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा WhatsApp Group | Facebook Page