कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध ; अजित पवारांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यातही रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर पुण्यात कड़क निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुण्यात कडक निर्बंध घालण्यात आले असून शाळा 21 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश घेण्यात आले आहेत. तसेच उद्यानं एकवेळ बंद राहणार आहे. त्याशिवाय हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंतच सुरू राहणार आहे, असे निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.

पुणे शहरात गुरुवारी नव्याने 1 हजार 504 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याअगोदर बुधवारी पुण्यात 1 हजार 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर मंगळवारी 1 हजार 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment