‘मी साहेबांना सांगूनच राजकीय भूमिका घेतली…’ अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत. आणि यामुळेच सर्व राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात तयारीचे वातावरण दिसत आहे. राज्यातील महाविकास आघाडी आणि महायुती सरकार हे त्यांच्या जागा वाटपासाठी बैठका देखील करत आहे. त्यातून कोणाला कुठल्या जागा द्यायच्या हे निश्चित केले जात आहे. यातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील वेगवेगळे प्रकार प्रकारे जनतेशी संवाद साधत आहेत. अशातच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची सध्या जन सन्मान यात्रा सुरू झालेली आहे. या यात्रेत अजित पवार हे स्वतः जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्या अडचणी समजून घेत आहे. काल अजित पवारांनी बारामती येथे ही जन सन्मान यात्रा घेतली होती. आणि यावेळी अजित पवारांनी भाषण करताना अप्रत्यक्षपणे शरद पवार यांना टोला लगावला आहे.

या भाषणामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, “मला काही राजकीय भूमिका घ्यावी लागली. ती भूमिका मी साहेबांना सांगूनच घेतली होती. साहेब पहिल्यांदा हो म्हणाले नंतर पुन्हा ते योग्य वाटत नाही असे म्हणाले. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे. कारण त्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे पुढे गेलेलो आहोत.”

उपमुख्यमंत्र्यांनी बारामती येथील डॉक्टरांच्या एका कार्यक्रमात भाषण केले. यावेळी ते म्हणाले की, “राजकारणात हे सगळं होत असताना तुम्हाला कधी त्रास झाला नाही. कारण आम्ही परिवार एक होतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अडचण आली नाही. नंतर मी काही ठिकाणी सुतवाच केलं होतं. हे तुम्ही बघितलं होतं काही डॉक्टरांनी पण मला फोन करून सांगितलं काय तुमच्या मनामध्ये? म्हणालो काही नाही बाबा शेवटी कुठे ना कुठे थांबावं लागतं. जसं आता डॉक्टर राजे थांबलेच आहे. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या पेशंटला सांगा काही काळजी करू नका. 1967 पासून काही मिळाले नाही. आता देत आहेत, तर घ्या मिळाले तेवढे काहीच सोडू नका. यांना पण इतकी वर्ष मत देत आलोय. आता काय होतंय दिलं म्हणून असं तुम्ही तुमच्या पेशंटला सांगा. अशाप्रकारे वक्तव्य केल्यानंतर सभागृहात सगळे हसायला लागले होते.”

विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार हे हे निवडणूक लढणार का? तसेच कुठून लढणार? याबाबत सर्व चर्चांना उधाण आलेले आहे. परंतु यावेळी राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले की, “मी पक्षाचा राष्ट्रीय अधिक कार्यकारी अध्यक्ष म्हणून हे अधिकृत सांगतो की, अजित पवार हे बारामती मतदारसंघातूनच उमेदवार असतील मी पक्षाची पहिली जागा जाहीर करतो.” असे त्यांनी सांगितले त्यामुळे आता अजित पवार हे बारामतीतूनच विधानसभा निवडणूक लढणार आहे यावर शिक्कामोर्तब झालेला आहे.