देहूतील कार्यक्रमाबाबत अजितदादा प्रथमच बोलले; म्हणाले की मला…

ajit dada
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत देहू येथील कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले होते. पंतप्रधान कार्यालयाने अजित पवारांना जाणूनबुजून भाषणाची संधी दिली नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. तर त्यानंतर भाजपनेही राष्ट्रवादी वर पलटवार केला होता. या एकूण सर्व घडामोडींवर थेट अजित पवारांनाच विचारलं असता त्यांनी यांवर अधिक बोलणं टाळलं.

बारामती येथे सायन्स अॅंड इनोव्हेशन अॅक्टीव्हिटी सेंटरच्या उद्धाटन कार्य़क्रमाच्या निमित्ताने अजित पवार आले असता पत्रकारानी त्यांना देहूतील कार्यक्रमाबद्दल विचारले. त्यावेळी अजित पवार म्हणाले, त्या कार्यक्रमाबाबत मला काहीही बोलायचे नाही. हा कार्यक्रम होऊन बरेच दिवस झाले. पंतप्रधान दिल्लीतही पोहचले. देहूत अतिशय चांगला कार्यक्रम झाला. देहू वारकरी संप्रदायातील अतिशय महत्वाचे ठिकाण आहे आणि पंतप्रधान या कार्यक्रमाला आले होते, याचे सर्वांना समाधान आहे.

दरम्यान, देहूतील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. मात्र अजित पवारांना भाषणाची संधी न दिल्याने राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. अजित पवारांना भाषणाची संधी न देणे हा महाराष्ट्राचा अपमान आहे अस खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटल होत.