हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यानिमित्ताने भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या महायुतीमध्ये जागावाटपाबाबतच्या बातम्या चर्चेत होत्या. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ९० जागा महायुतीत लढवले असं म्हंटल होते, तर अनिल पाटील यांनीही भुजबळांच्या सुरत सूर मिसळत ८५ ते ९० जागांची मागणी केली होती. आता खुद्द अजित पवारांनीच (Ajit Pawar) आपण विधानसभेला किती जागा लढवू याबाबत आकडाचा जाहीर केला आहे. त्यानुसार दादा गट ८५ जागा विधानसभेला लढवणार असल्याचे समोर येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नुकतीच मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आणि प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणूक महायुतीतूनच लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्याचबरोबर यावेळी राष्ट्रवादी 85 जगांवर लढणार असल्याची विधान अजित पवार यांनी केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. निवडणूक अवघ्या ३ महिन्यावर आल्या असुन त्यादृष्टीने तयारीला लागण्याचे आदेश अजित पवारांनी आपल्या नेत्यांना दिले आहेत. काय करावं? कोणत्या गोष्टी टाळाव्या? याबाबतच्या टिप्स सुद्धा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत. येत्या काळात आपला पक्ष आणखी वाढेल असा विश्वास अजित पवारांनी या बैठकीत व्यक्त केला.
आपल्या मित्रपक्षांसोबत वादग्रस्त विधान टाळा, सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोचवा अशा सूचना अजित पवारांनी नेतेमंडळींना दिल्या आहेत. माझी लाडकी बहीण, महिलांना अर्ध्या तिकिटात बस प्रवास यासांरख्या लोकप्रिय योजनांचा प्रचार आणि प्रसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जनतेमध्ये करावा असेही अजित पवारांनी सांगितलं आहे. दरम्यान, अजित पवार ८५ जागा लढवणार असेल तर मी,ग शिंदे गट आणि भाजप किती जागांवर आपले उमेदवार उभे करणार हा प्रश्न निर्माण झालाय. आमदारांचे बलाबल पाहता शिंदे गटाला सुद्धा ८५ ते ९० जागा मिळू शकतील तर भाजप ११० ते १२० जागांवर विधानसभा निवडणूक लढवेल असं बोललं जातंय.