व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

अजित पवारांनी पुन्हा एकदा आमच्यासोबत यावं; भाजपची खुली ऑफर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली असली तरी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील पहाटेच्या शपथविधी ची चर्चा अजूनही सुरू असते. त्यातच आता भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक विधान करत पुन्हा एकदा या शपथ विधी च्या आठवणी ताज्या केल्या आहेत. अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजपसोबत यावं अशी खुली ऑफरच त्यांनी दिली आहे.

अहमदनगर येथील एका कार्यक्रमात बोलत असताना विखे पाटील म्हणाले, अजित पवार शिस्तप्रिय आणि कार्यक्षम आहेत. त्यांनी पुन्हा आमच्यासोबत लवकर येण्याचा निर्णय घ्यावा. तसेच देवेंद्र फडणवीस कणखर आणि डायनॅमिक नेते आहेत, त्यांनी राज्यात लवकरात लवकर भाजपाचे सरकार आणावे अस म्हणत त्यांनी फडणवीसांचे देखील कौतुक केले.

दरम्यान, विखे कुटुंब आणि पवार कुटुंबातील संघर्षाविषयी विचारले असता विखे पाटील म्हणाले की, आमच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत. राजकारणात अशी मतभिन्नता असतेच. आम्ही आमच्या वडिलांच्या विचाराने पुढे जात आहोत.