हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेस कडून आम्हाला निधी मिळाला नाही अस कारण सांगून एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हुन अधिक बंडखोर आमदारानी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी आज भर सभागृहात बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात दिलेल्या निधीची आकडेवारी जाहीर करून त्यांचा आरोप खोडून काढला.
अजित पवार म्हणाले, आम्ही कधीही निधी देताना भेदभाव केला नाही. एकनाथ शिंदेंना ३६६ कोटींचा निधी दिला. संदीपान भुमरे याना १६७ कोटी, उदय सामंत याना २२१ कोटी, दादा भुसे ३०६ कोटी, गुलाबराव पाटील याना ३०९ कोटी रुपयांचा निधी दिला. शंभूराज देसाई २९४ कोटी, अब्दुल सत्ता याना २०६ कोटी, अनिल बाबर १८६ कोटी, महेश शिंदे याना १७० कोटी, शहाजी पाटील याना १५१ कोटींचा निधी दिला असे सांगत अजित पवारांनी बंडखोर आमदारांचा निधी बाबतचा दावाच खोडून टाकला
तुम्ही म्हणता मी अन्याय केला.मी भेदभाव करणारा माणूस नाही. 1 कोटींचा आमदार निधी मी अर्थमंत्री असतानाच 2 कोटी केला. त्यानंतर शिंदेंनी त्यांच्या सरकारमध्ये तो 3 कोटी केला. नंतर महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर 5 कोटी आमदार निधी केला याची आठवण अजित पवारांनी करून दिली