सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सत्ता असताना सत्तेचा माज आम्ही होऊन दिला नाही कि सत्तेची मस्ती किंवा नशा डोक्यात शिरू दिली नाही. कधी मी उपमुख्यमंत्री होतो. परंतु जमिनीवर पाय ठेऊन आम्ही चालायचो. तशा प्रकारे आत्ताच्या सरकारमधील करत नाही. आज मंत्री तर अक्षरशः कुणाला विचारत नाहीत. या सरकारला सत्तेची मस्ती आलेली आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी टीका केली.
कोरेगाव येथे आज शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी विरोधी पक्षणेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी शिंदे – भाजप सरकारवर निशाणा साधला. अजित पवार म्हणाले की, राज्यात शिंदे फडणीस सरकारकडून ठराविक आमदारांना संभाळण्याचे काम चाललेले आहे. आणि वाट्टेल तशा प्रकारामध्ये प्रशासनामध्ये अक्षरशः भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. बदल्यांमध्ये रेट ठरलेले आहेत. मी सांगत नाही कारण मी विरोधी पक्षात आहे. मीच नाही तर राजू शेट्टींनी देखील सांगितले कि रेट ठरलेले आहेत.
आज आमची सत्ता नसली तरी फोन केला तर एखादा अधिकारी लगेच दाद का देतात? सत्ता असताना सत्तेचा माज आम्ही होऊन दिला नाही कि सत्तेची मस्ती किंवा नशा डोक्यात शिरू दिली नाही. त्याहीवेळी अधिकाऱ्यांना रिस्पेक्शत देऊनच वागवलं. कॅबिनेट बैठक असायची त्यावेळी बाळासाहेब आणि बाकीचे बघायचे. ज्यावेळेस उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही कॅबिनेट चालवायचो. प्रशासनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी कित्येकवेळा श्रीनिवास पाटील तसेच प्रभाकर देशमुख यांच्याकडे कार्यकर्ता म्हणून कामे घेऊन जायचो. मुख्यमंत्री ३ दिवस गावी राहुन ६५ फाईल्सचा निपटारा केला असं सांगतात मात्र ३ हजार फाईल्स पेंडींग आहे त्या बघा, मी एवढ्या फाईल्स ३ तासात निपटवतो असं देखील अजित पवार म्हणाले .