अरे शहाण्या, तू आमदार आहेस,तू मास्क घातला नाहीस तर…; अजितदादांच्या रोहित पवारांना कानपिचक्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या रोखठोक स्वभावासाठी आणि जोरदार फटकेबाजी साठी ओळखले जातात. आता तर त्यांनी पुतणे रोहित पवार यांनाच मास्क न वापरल्या मुळे कानपिचक्या दिल्या. शहाण्या तु एका मतदारसंघाचा आमदार आहेस, तुच जर मास्क नाही घातलेस तर मी लोकांना मास्क वापरण्यास कसे सांगू असे अजितदादांनी म्हंटल.. ते बारामती तालुक्यातील धुमाळवाडीमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

कर्जत जामखेडला गेलो असता मला तिकडे कोणीच मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. आमच्या रोहितने पण मास्क घातले नव्हते, शेवटी मीच न राहून रोहितला म्हटले शहाण्या तु या मतदारसंघाचा आमदार आहेस, तुच जर मास्क नाही घातलेस तर मी लोकांना मास्क वापरण्यास कसे सांगू? मी भाषण करताना कधीच मास्क काढत नाही, आणि तिथे मला एकानेही मास्क घातलेले दिसले नाही, असे अजितदादांनी म्हंटल.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात कोरोनाचे संकट होते. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र आता रुग्ण कमी होत असल्याने शासनाकडून काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. मात्र तिसरी लाट आली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल, त्यामुळं टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असा इशाराही अजित पवारांनी दिला