सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी वडूज येथे आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी बैठकीनंतर ते जात असताना मुस्लिम समाजातील बांधवांच्या वतीने अजितदादांचा रमजान महिन्यातील सणानिमित्त पठाणी रुमाल देत सन्मान करण्यात आला. यावेळी अजितदादांनी सन्मान स्वीकारत नमाजी टोपी स्वतः परिधान केली.
रमजानचा पवित्र महिना हा मुस्लिम बांधवांच्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो. या महिन्यात मुस्लिम समाजातील लोक महिनाभर उपवास करतात आणि देवाची पूजा करतात. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार हे वडूज येथे पधाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी त्यांची तालुक्यातील मुस्लिमसमाज बांधवांनी भेट घेतली.
अन् अजितदादांनी खांद्यावर पठाणी रुमाल घेत डोक्यात घातली नमाजी टोपी
साताऱ्यातील वडुजमध्ये मुस्लिम बांधवांकडून सन्मान pic.twitter.com/kj48Kt5yeM
— santosh gurav (@santosh29590931) April 6, 2023
अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांचा मुस्लिम समाजबांधवाच्या वतीने पठाणी रुमाल आणि नमाजी टोपी देत सन्मान केला. यावेळी अजितदादांना पुष्पगुच्छही देण्यात आले. सामाजिक सलोखा राखून अजितदादांनीही मुस्लिम बांधवांना रमजान सणाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.