… तो पर्यंतच शिंदे फडणवीस सरकार टिकणार; अजित पवारांनी आकडेवारी सांगत केला दावा

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – 145 हा बहुमताचा आकडा जोपर्यंत आहे तो पर्यंत सरकार टिकणार असा दावा राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. मंत्रिपदावरुन शिंदे गटातल्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळं काही काळ थांबा, सर्वच समोर येईल असेदेखील ते (Ajit Pawar) यावेळी म्हणाले. तसंच एकनाथ शिंदेंनी केलेलं बंड, शिवसैनिकांना आवडलेलं नाही, असंदेखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले आहे.

काय आहे नेमकी आकडेवारी?
विधानसभेच्या 288 जागा असून बहुमताचा आकडा 145 इतका आहे. शिंदें गटाकडे 40 आणि अपक्ष तसंच इतर 10 आमदारांसह 50चं संख्याबळ आहे. भाजपकडे स्वत: 106 आमदार आणि इतर 8 असे एकूण 114 आमदार होताच. म्हणजेच शिंदे-भाजप सरकारचं संख्याबळ होते, 164 आमदाराचं. MIMकडे 2 आमदार असून, MIMचं नं कोणालाही पाठींबा दिलेला नाही. आणि त्यामुळं महाविकास आघाडीकडे एकूण 122 आमदार आहेत.

शिंदे गटातील काही आमदार नाराज असून जर त्यांना मंत्रिपद नाही मिळाले तर ते सरकारमधून बाहेर पडतील असा दावा अजित पवार यांनी केला आहे. राजकारणात संख्याबळाला महत्वं असते. साडे 3 महिन्यांआधी महाविकास आघाडीकडे बहुमत होतं..पण बंडामुळं समीकरण बदललं आणि संख्याबळ शिंदे गट आणि भाजपच्या बाजूनं झुकलं. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेला दावा योग्य ठरतो कि शिंदे – फडणवीस सरकार आपला अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!