Saturday, June 3, 2023

पवारांना मोदींचे शाल जोडे : शेतीला पाणी पोचवायला संवेदना असावी लागते

अकलूज प्रतिनिधी | माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदी यांची आज अकलूज येथे सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर कडाडून टीका केली आहे. शरद पवार यांनी ज्या भागाचे प्रतिनिधित्व केले. तो भाग देखील त्यांनी कोरडा ठेवला आहे असे नरेंद्र मोदी शरद पवार यांचे नाव नघेता म्हणाले आहेत.

मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना चारशे किलोमीटर कच्छच्या रणात पाणी घेऊन गेलो. तेथील शेतकरी आज आंब्याची परदेशात निर्यात करत आहे. हे मी गुजरात मध्ये करू शकलो मग ते महाराष्ट्रात का होऊ शकत नाही असा सवाल करत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव नघेता, हे सर्व करण्यासाठी शेतकऱ्याच्या वेदना आपल्या वेदना वाटाव्या लागतात.शेती बद्दल संवेदना असावी लागते असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

माढा मतदारसंघ हा ऊस शेतकऱ्याचा मतदारसंघ आहे हे लक्षात घेवून नरेंद्र मोदी यांनी साखर उद्दोगाला त्यांचे सरकार कसे अनुकूल आहे याचे विश्लेषण केले. साखरेचे ३१ रुपये हे मूल्य आमच्या सरकारने निर्धारित केले. शरद पावर त्यांच्या सरकारमध्ये देखील हा निर्णय घेवू शकत होते मात्र त्यांनी हा निर्णय घेतला नाही. साखर उद्योग व्यवस्थित चालवा यासाठी आम्ही ऊसापासून साखरे बरोबर इथेनॉल निर्मितीवर भर देत आहे असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.