Wednesday, June 7, 2023

आजच्या सभेची गर्दी बघून मला कळाले की शरद पवार माढ्याचे मैदान सोडून का पळाले

अकलूज प्रतिनिधी | माढा लोकसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर  यांच्या  प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज अकलूज येथे सभा पार पडली आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाचे अक्कोलकोटच्या स्वामी समर्थनाचे आणि आहिल्याबाई होळकर यांच्या नावाचा मराठीत उल्लेख करून नरेंद्र मोदी यांनी भाषणाची सुरवात केली.

शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली. त्या संदर्भात नरेंद्र मोदी यांनी तोंडसुख घ्यायचे सोडले नाही. आज मला लोकांचा हा भगवा सागर बघून समजले कि शरद पवार माढ्यातून मैदान सोडून का पळून गेले असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

त्याच प्रमाणे शरद पवार हे हवेचा अंदाज ओळखणारे नेते आहेत. ते स्वतःवर आणि स्वतःच्या परिवाराला थोड ही खरचटू देत नाहीत असे देखील नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. माझ्या परिवारावर बद्दल आज काल शरद पावर सारखी टीका करत आहेत. त्यांना माझे सांगणे आहे कि मी भारतीय संकृतीच्या कुटुंब पद्धतीची प्रेरणा घेवूनच राजकारणात आलेलो आहे. त्यामुळे तुम्ही माझा परिवार असण्यावर आणि नसण्यावर टीका करू नका असे नरेंद्र मोदी म्हणालेआहेत. 

तसेच शरद पवार माझ्यावर परिवाराचा मुद्दा धरून टीका करतात. ती टीका त्यांच्यावर असणाऱ्या संस्कारातून येते. शरद पावर यांना त्यांचे गुरु यशवंतराव  चव्हाण यांचा परिवार समजला असता तर त्यांना मोदींचा परिवार देखील समजला असता असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.