“इम्तिहान बाकी है अभी हौसलों का वक़्त आ गया है अब…”; निकाला आधीच अखिलेश यादवांचे ट्विट

0
67
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी बरोबर आठ वाजता सुरुवात झाली. करहल मतदार संघातून समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव आघाडीवर आहेत. अशात अखिलेश यादव यांनी आज एक ट्वीट करून निकालाआधीच फटाके उडवले आहेत. “इम्तिहान बाकी है अभी हौसलों का वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का,” असे ट्विट त्यांनी केले आहे.

अखिलेश यादव यांनी ट्वीट केले असून त्यात त्यांनी म्हंटले आहे कि, इम्तिहान बाकी है अभी हौसलों का वक़्त आ गया है अब ‘फ़ैसलों’ का. मतगणना केंद्रों पर दिन-रात सतर्क और सचेत रूप से सक्रिय रहने के लिए सपा-गठबंधन के हर एक कार्यकर्ता, समर्थक, नेतागण, पदाधिकारी और शुभचितंक को हृदय से धन्यवाद !,” असे यादव यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

पाच राज्यांपैकी सर्वाधिक लक्ष उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालावर लागले आहे. उत्तर प्रदेशातील मतदारांचा कौल कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावर देशाच्या आगामी राजकारणाची दिशा ठरणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्ष आणि आरएलडीने निवडणूक लढवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here