बडे दिलवाला अक्षयची मुंबई पोलिसांना पुन्हा एकदा मदत; पुरवले १ हजार हेल्थ बॅण्ड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या संकटात सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण शक्य होईल तशी प्रशासनाला आणि गरजूंना मदत करत आहे. यामध्ये खिलाडी अक्षय कुमार सातत्याने मदतीचा हात पुढे करत आहे. आतापर्यंत अक्षयने विविध मार्गांनी पोलिसांना, करोनाग्रस्तांना, महानगर पालिकेला, गरजुंना मदत केली आहे. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’नुसार, अक्षयने मुंबई पोलिसांना सेन्सॉर असलेले १ हजार मनगटावर बांधायचे हेल्थ बॅण्ड पुरवले आहेत. या बॅण्डच्या मदतीने पोलिसांच्या शरीराचं तापमान तपासता येणार आहे. मनगटावर बांधण्यात येणाऱ्या या बॅण्डमुळे पोलिसांच्या शरीराचं तापमान, हृदयाचे ठोके, रक्तदाब, कॅलरी या सगळ्या गोष्टी तपासता येणार आहेत. सध्याच्या काळात पोलीस अहोरात्र काम करत असून बऱ्याच वेळा ते त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी अक्षयने हे बॅण्ड पुरविल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, अक्षय सातत्याने त्याला शक्य होईल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी त्याने पंतप्रधान केअर फंडमध्ये २५ कोटी रुपयांची रक्कम केली आहे. तर मुंबई महानगरपालिकेला ३ कोटी रुपयांची रक्कम डॉक्टरांच्या पीपीई किट, मास्क आणि रॅपिड टेस्ट किट खरेदीसाठी दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment