फ्रान्सच्या सैन्याने मोस्ट वॉन्टेड उत्तर आफ्रिका अलकायदा प्रमुखाचा असा केला खात्मा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पॅरिस । उत्तर आफ्रिकेत अल कायद्याच्या दहशतवादी कारवाया करणारा आणि अल कायदाचा उत्तर आफ्रिका प्रमुख अब्देलमालेक ड्रॉकडेलचा खात्मा करण्यात आला आहे. फ्रान्सच्या सैन्याने केलेल्या कारवाई अब्देलमालेक ठार झाला आहे. फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी या गोष्टीची पुष्टी केली.

फ्लोरेन्स पार्ली यांनी सांगतिले की, या मोहिमेत इस्लामिक स्टेट दहशतवादी गटांच्या एका कमांडरला पकडण्यात आले आहे. दहशतवादा विरोधात हे मोठे यश मिळाले असून फ्रान्सचे सैनिक दहशतवाद्यांविरोधात आपली मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. मालीमध्ये वर्ष २०१३ पासून फ्रान्सचे हजारो सैनिक तैनात आहेत. इस्लामिक स्टेटच्या दहशतवादाविरोधात फ्रान्सच्या सैनिकांची मोहीम सुरू आहे. फ्रान्सच्या या कारवाईमुळे अलकायदाला मोठा धक्का बसला आहे.

अल कायदा इस्लामिक मगरेबचा प्रमुथ अब्देलमालेक उत्तर आफ्रिकेतील दहशतवादी संघटनेच्या सर्व कारवायाची आखणी करत होता. त्याशिवाय अल कायद्याच्या जमात नुसरत अल-इस्लाम वल मुस्लिमिम या संघटेनेचेही नेतृत्व करत होता. त्याशिवाय त्याने अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत फौजांविरोधातील लढाईत सहभाग घेतला होता. अल्जेरियामध्ये २००७मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचे नियोजनही त्यानेच केले असल्याचा आरोप होता. मागील अनेक वर्षांपासून त्याचा शोध सुरू होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment