पुणे : हॅलो महाराष्ट्र – भक्तिभावपूर्ण वातावरणात विठ्ठलनामाच्या गजरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बुधवारी पुण्यात दाखल झाला. यावेळी हलक्या सरींच्या वर्षांवाने वारकऱ्यांचा (Warakari) आनंद द्विगुणित झाला आणि त्यांच्या उत्साहाला उधाण आले. यादरम्यान वारकऱ्यांनी (Warakari) मेट्रो सफरीचा आनंद लुटला. पुणेकरांचा पाहुणचार घेऊन या दोन्ही पालख्या आज पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या. गरवारे ब्रिज ते वनाज असा वारकऱ्यांनी (Warakari) मेट्रोतून प्रवास केला. एवढंच नाहीतर मेट्रोतच भजन गात प्रवाशांनाही टाळ मृदुंगावर वारकऱ्यांनी ठेका धरायला लावला.
टाळ-मृदुंगाचा गजर पुण्याच्या मेट्रोत दुमदुमला, भक्तीमय वातावरणात प्रवासी झाले तल्लीन pic.twitter.com/OS29eurfgz
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 24, 2022
बुधवारी रात्रीपासून मार्केट यार्डात व्यापाऱ्यांनी वारकऱ्यांचे (Warakari) भव्य स्वागत केले. कोणी हार घालून, कोणी पाय धुवून, तर कोणी विविध वारकरी (Warakari) पोषक परिधान करून त्यांचे स्वागत केले. मार्केट यार्डात सुमारे 150-200 दिंड्यांच्या माध्यमातून सुमारे 20 हजार वारकऱ्यांनी (Warakari) काल पुण्यात मुक्काम केला. त्यामुळे संपूर्ण मार्केट यार्डात भक्तिमय वातावरण झाले होते.
आळंदी येथून मंगळवारी प्रस्थान ठेवलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा गांधी वाडा येथील आजोळघरी मुक्काम होता. तेथून सकाळी पालखीचे पुण्याकडे मार्गक्रमण झाले, तर आकुर्डी येथील तुकाराम महाराज यांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी दुपारी कळस येथे आल्यानंतर महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त विलास कानडे यांनी पालखीचे स्वागत केले. बोपोडी येथील हॅरिस पुलाजवळ संत तुकाराम महाराज यांची पालखी पोहोचताच अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार आणि सहआयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पालखीचे स्वागत केले.
हे पण वाचा :
आता रशियामध्ये सुरु होणार भारतीय सुपरमार्केटची साखळी, ब्रिक्स परिषदेत पुतिन यांनी दिले संकेत
अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई
शरद पवार हे आमचं दैवत, त्यांच्या वक्तव्यावर बोलण्याची माझी लायकी नाही : अजित पवार
राकेश झुनझुनवालाची गुंतवणूक असलेल्या ‘या’ शेअर्सने 2 वर्षांत दिला 175% रिटर्न !!!