सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
जावळी तालुक्यातील सरताळे गावातील ग्रामसेवकांचा भोंगळ कारभारामुळे लोकांना दूषित पाणी पिल्याने बाधा झालेली आहे. ग्रामपंचायतीच्या शिपायाने दारूच्या नशेत नळ पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत टी. सी. एलची भरलेली संपूर्ण पिशवी टाकल्याचा प्रकार केला आहे.
सरताळे गावातील सरपंचासह सदस्य आणि गावातील 50 हुन अधिक नागरिकांना दूषित पाणी पिल्याने झाली बाधा झाली आहे. या दूषित पाण्यामुळे अनेकांना त्रास होवू लागला आहे. उपचार घेत असलेल्या काहींची प्रकृती गंभीर तर काही किरकोळ उपचार घेऊन सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई, सातारा, पाचवड येथे उपचारासाठी नागरिक दाखल झालेले आहेत. सरताळे गावातील पाणी योजनेच्या विहीरीत शिपायाने दारूच्या नशेत टी. सी. एलची पिशवी संपूर्ण टाकली. परंतु या भोंगळ कारभाराला ग्रामसेवकही जबाबदार असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केला आहे.