मराठा मूक मोर्चा : कोल्हापूरात मुस्लिम बाल मावळ्याची तोफ धडाडली; संभाजीराजेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी कोल्हापूर येथे बुधवारी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मूक आंदोलन पार पडले. या आंदोलनात अनेक संघटना, संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. मात्र, या आंदोलनाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी एका छोट्या मुस्लीम बालक याने रेहान खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या समोर मांडलेली जहाल भूमिका होय. लहान मुस्लिम मावळ्यांने केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली मूक मोर्चा आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवसेना खासदार संजय मंडलिक भेट देत आपली मते व्यक्त केली. यापूर्वी आंदोलनस्थळी सकाळी एका मुस्लिम मावळ्याने येऊन मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. त्या बाल मावळ्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र गाजत आहे.

 

या व्हिडिओत बाल मावळा रेहान म्हणतो कि, ” १६ जून २०२१ ला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यावंच लागणार बरं का ! कारण मराठा वस्ती नाही तर मराठा राज्य आहे. मराठा ठिणगी नाही तर मराठा आग आहे. झुकतील भले भले भविष्यात आमच्यापुढे कारण मराठा झुकणार नाही तर मराठाच झुकवणार आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेर्तृत्वाखाली होणाऱ्या आंदोलनातून मी छोटा शिवबाचा मुस्लिम मावळा रेहान सरकारला विनन्ती करतो कि, या आंदोलनाची दखल घ्यावी. नाहीतर मराठ्यांचा इतिहास हा सर्वांना माहितीच आहे. मराठ्यांच्या हातात तलवारी आल्याशिवाय राहणार नाहीत हीच शेवटची विनन्ती. कारण येथून पुढे विनंती नसणार आहे.