सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकानं आणि परमीट रुम बार तसेच ताडी विक्रीची शुक्रवारपासून ते ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने गुरुवारी घेतला. जिल्ह्यातील बाजारपेठामध्ये गर्दी होवू नये, यासाठी दररोज ५० टक्के व्यापारपेठा बंद करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत करोनाचा एकही करण्याचा रुग्ण आढळलेला नाही, मात्र जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून खबरदारी घेतली जात आहे.
धार्मिक स्थळे पर्यटन क्षेत्र शाळा महाविद्यालय मॉल्स तसेच एसटीच्या काही फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात, ती ठिकाणी बंद करण्यात आली आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मद्यविक्रीची दुकानं आणि परमीट रुम बार तसेच ताडी विक्रीची दुकानं ३१ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परिस्थितीत मद्यविक्री करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. परदेशातून येणार्या प्रवाशांवर प्रशासनाची करडी नजर असून जिल्ह्यात आत्तापर्यंत २१३ जण बाहेरुन आले आहेत. मालगावमधील ९ प्रवाशांवर होम क्वॉरंटाईनचा शिक्का आरोग्य विभागाकडून मारण्यात आला.
सध्या कोरोनाची भीती पाहायला मिळते, अनेक सार्वजनिक सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर अनेकांना घरु काम करण्यास सांगितले आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा सुरु आहेत. खरेदीसाठी अद्यापही बाजारात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बाजारपेठेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठांमध्ये गर्दी होवू नये, यासाठी दररोज ५० टक्के व्यापारपेठा बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. बाजारपेठांबाबत सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींना संबंधित अधिकार्यांना याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्याबाबतची अंमलबजावणी 20 मार्चपासून करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्याकरता आमच्या 8080944419 या नंबरला Whatsapp करून Hello News असा मॅसेज पाठवा.
कोरोनासंबंधीच्या या बातम्याही वाचा –
करोनाविरुद्धच्या लढाईत बॉलीवूडकर आले समोर; पहा व्हिडिओ..
कोरोनाच्या संकटात माणुसकी सोडू नका – मुख्यमंत्री ठाकरे
जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद राहणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
व्हिडिओ: ऐका हो! करोना पोवाडा..कोल्हापूरच्या शाहिराचा अनोखा जनजागृती पोवाडा
लोकलच्या गर्दीत केवळ ३० टक्के घट; लोकल बंद करण्याचा आरोग्यमंत्र्यांनी दिला कडक इशारा