नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी कर्ज देणारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. SBI ने नोटीस जारी करत ग्राहकांना त्यांचा पर्मनंट अकाउंट नंबर आधारशी 30 सप्टेंबर 2021 पूर्वी लिंक करण्यास सांगितले आहे. यामध्ये असेही म्हटले गेले आहे की, जर ग्राहकांनी असे केले नाही तर त्यांना बँकेच्या सेवा मिळणे अवघड होईल. त्यांचे बँक खाते सुद्धा बंद केले जाऊ शकते. त्याचबरोबर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने म्हटले आहे की, जर ते 30 सप्टेंबरपर्यंत आधारशी लिंक केले गेले नाही तर पॅन कार्ड इनऍक्टिव्ह होईल. असे झाल्यास तुम्हाला इन्कम टॅक्स कायद्यांतर्गत 1000 रुपये दंड भरावा लागेल.
पॅनला आधारशी कसे लिंक करावे
>> सर्वप्रथम, इन्कम टॅक्स वेबसाइटच्या मदतीने, तुमचे पॅन आधारशी लिंक केले आहे की नाही ते शोधा.
>> यासाठी आधी इन्कम टॅक्स वेबसाइटवर जा.
>> आधार कार्डवर एंटर केल्याप्रमाणे नाव, पॅन क्रमांक आणि आधार क्रमांक एंटर करा.
>> आधार कार्डमध्ये जन्माचे वर्ष नमूद असेल तरच स्क्वेअरवर टिक करा. नंतर कॅप्चा कोड एंटर करा.
>> यानंतर लिंक आधार वर क्लिक करा. तुमचा पॅन आधारशी जोडला जाईल.
SMS पाठवून लिंक कशी करावी
SMS द्वारे पॅनला आधारशी लिंक करता येईल. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर UIDPAN टाईप करावे लागेल. यानंतर, 12-अंकी आधार क्रमांक आणि 10-अंकी पॅन क्रमांक एंटर करा. आता हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा. तुमचा पॅन आधारशी जोडला जाईल.
निष्क्रिय पॅन कसे चालू करावे ?
निष्क्रिय पॅन कार्ड पुन्हा चालू केले जाऊ शकते. यासाठी तुम्हाला SMS पाठवावा लागेल. तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जाऊन तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलमधून 12 अंकी पॅन टाकावा लागेल. यानंतर, स्पेस देऊन 10-अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर हा मेसेज 567678 किंवा 56161 वर SMS करा.