Sunday, May 28, 2023

Alert ! फसवणूक करणाऱ्यांनी कार्ड क्लोनिंगसाठी लावला आहे नवीन पद्धतींचा शोध,त्याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । एटीएम कार्ड क्लोनिंग करून त्यातून पैसे काढण्याचे जुने मार्ग आता सामान्य झाले आहेत ज्यामुळे फसवणूक करणार्‍यांनी आता नवीन मार्ग शोधले आहेत. ही पद्धत देखील अशी आहे की, जेव्हा पोलिसांना याची माहिती झाली तेव्हा त्यांना सुद्धा धक्काच बसला. जोपर्यंत आपल्याला या नवीन पद्धतीबद्दल माहिती होणार नाही, तोपर्यंत कदाचित आपल्या एटीएम कार्डचे क्लोनिंग करून पैसे कसे काढले गेले आहेत हे आपल्याला कळणार सुद्धा नाही. नुकत्याच अशाच परिस्थितीचा सामना नोएडा पोलिसांना करावा लागत असून एटीएम कार्ड क्लोनिंगची नवीन पद्धत पाहून पोलिसही थक्क झाले आहेत. त्यामुळे आता आपण जर एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलात तर विशेषत: हे लक्षात ठेवा नाहीतर आपणदेखील या फसवणूकिला बळी पडू शकाल.

फसवणूक करणारे हिडन कॅमेरे वापरत आहेत
एटीएम कार्ड क्लाेनिंगसाठी एटीएममध्ये क्लाेनिंग मशीन बसवण्याची अनेक प्रकरणे तुम्ही आतापर्यंत ऐकली असतील. तसेच, मागे उभे असलेला एखादा माणूस या दरम्यान आपला पासवर्ड देखील पाहतो. परंतु अशा वाढत्या प्रकरणांची जाणीव झाल्यानंतर आता या फसवणूकीसाठी एक नवीन मार्ग तयार केला गेला आहे ज्याबद्दल कोणी विचारही करू शकणार नाही. नोएडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एटीएममध्ये कार्ड स्वाइपऐवजी स्कीमर डिव्हाइस वापरत आहेत, जेणेकरून जेव्हा एखादी व्यक्ती पैसे काढण्यासाठी डेबिट कार्ड स्वाइप करेल तेव्हा त्या कार्डवरची काळी पट्टी आणि सीव्हीव्ही नंबर यासारखा सर्व डेटा स्कॅन केला जाईल. ही पद्धत जवळजवळ पूर्वीसारखीच आहे, जिथे पासवर्ड पाहण्यासाठी एटीएमवर कोणी ना कोणी या ना त्या बहाण्याने येत होता, आता त्याऐवजी ही लोकं एटीएम कीपॅडजवळ एक छोटा कॅमेरा ठेवतात. ज्यामुळे पासवर्डची माहिती होणे खूप सोपे होते.

क्लाेनिंग मशीन फिट केली आहे कि नाही अशा प्रकारे कळेल
बँकिंग क्षेत्राशी संबंधित अनुरागच्या म्हणण्यानुसार एटीएममध्ये पैसे काढताना घाई करणे खूप महागात पडू शकते. ते म्हणतात की,” क्लाेनिंग मशीन फिट केली आहे कि नाही हे काही सोप्या मार्गाने हे शोधले जाऊ शकते. यासाठी पहिले आपण कार्ड स्वॅप करणार असलेल्या पंप पॅनेलकडे काळजीपूर्वक पहा, तसेच ते हलवून बघा कि स्वतंत्रपणे बसवले तर गेलेले नाही ना. दुसरी गोष्ट म्हणजे आपण एटीएमचा पासवर्ड एंटर करता तिथे बारकाईने पहिले तर तुम्हांला जाणवेल कि फसवणूक करणारे त्याप्रमाणेच चिप तयार करतात आणि ते कीपॅडवर लावतात. हिडन कॅमेरा खूप सहज ओळखला जाऊ शकतो कारण पासवर्ड तपासण्यासाठी तो कीपॅडच्या सभोवतालीच लावलेला दिसेल किंवा असे काही होल असेल जिथे कॅमेरासारखे काही दिसत असेल तरीही पैसे काढू नका आणि ताबडतोब पोलिसांना कळवा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.