परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
सेलु शहरामधील दुर्धरआजारा सोबत कोरोनाबाधीत महिलेचा दोन दिवसापूर्वी नांदेड येथील शासकिय दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यु झाल्यानंतर, मयत महिलेचा दफनविधी नांदेड येथील दफनभूमीत करण्यात आल्याची माहीती नांदेड प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर सदरील मयत महीला रुग्णाच्या सहवासातील सेलु व परभणी येथील खाजगी रुग्णालयातील व इतर असे एकुण ७१ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्यानंतर त्यातील ६९ स्वॅब निगेटीव्ह आले असुन २ स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत.
मागील महीन्याच्या शेवटी औरंगाबादहुन दुर्धर आजार असणारी महिला उपचारानंतर सेलू यामुळ गावी आली होती. आल्यानंतर तब्येत खालावल्याने सदरील महिलेस परभणी येथील खाजगी दवाखाना व नंतर नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. याठिकाणी तपासणी केली असता सदरील महिला कोरोना संसर्गबाधीत असल्याचेही निष्पन्न झाले होते. उपचारादरम्यान गुरुवारी रात्री कोरोना बाधीत महिलेचा मृत्यु झाला होता. यावेळी मृत महिलेचा दफनविधी नांदेड येथेच करण्यात आल्याची माहीती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान दिलासादायक वृत्त असे आहे कि, मयत महिलेल्या संपर्कात आलेली हायरीस्क १७ व लो – रिस्क ३४ व इतर १८ असे एकुण ६९ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले असुन दोन तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. शुक्रवार दि .१मे सांयकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हात कोरोना (कोव्हिड १९) विषाणु बाधित एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. नव्याने सशंयीत दाखल झालेल्या रुग्णांचे स्वॅब स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असुन जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात जिल्हा रुग्णालय परभणी येथे पूर्वीचे ८०३ व आज काल दाखल ५४ असे एकूण ८५७ संशयितांची नोंद झालेली आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.