नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक कोंडी फोडण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. देशभरातील दुकाने काही अटींवर उघडण्याची परवानगी केंद्राने दिली आहे. शहरांमधील बाजारपेठांमधील दुकाने सोडून बाकी दुकाने उघडण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्रालयानं याबाबत मोठा निर्णय घेतला. काही अटींसह सरकारनं आता दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता दुकानदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुकानांना जरी परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्स मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत.
गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने काही अटींवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी म्हणजेच आज सकाळपासून हा आदेश लागू होणार आहे. महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील निवासी भाग व परिसरातील दुकाने या आदेशानुसार उघडता येणार आहेत. त्याचवेळी शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व मॉल्स तूर्त बंदच राहणार आहेत. दरम्यान कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असलेल्या म्हणजेच हॉटस्पॉट असेलेल्या आणि कॅन्टोनमेंटच्या ठिकाणी मात्र दुकानं उघडी ठेवता येणार नाहीत. याव्यतिरिक्त मद्य विक्रीची दुकानं तसंच मॉल्स सुरू करण्याला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या शॉप्स अँड एस्टॅबलिशमेंट कायद्याअंतर्गत येणाऱ्या दुकांनांनाच सुट देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने दुकाने उघडण्याची सवलत देताना काही अटी घातल्या आहेत. जी दुकाने नोंदणीकृत आहेत त्यांनाच ही परवानगी असणार आहे. दुकानात ५० टक्के कर्मचारीच काम करू शकतील. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचं आहे तसेच मास्क व हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक असेल, असे नमूद करण्यात आले आहे. रमजानचा महिना सुरू झाल्याने त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, राज्य सरकार मात्र आपल्या अधिकारानुसार दुकानं सुरू ठेवायची अथवा नाही यावर निर्णय घेऊ शकतात. तसंच सामान्य दुकानांना ५० टक्के कामगारांसह काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. तसंच काम करणाऱ्यांना मास्क घालणं तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त पालिका आणि नगरपालिकांच्या बाजारपेठांमधील दुकानं मात्र ३ मे पर्यंत उघडता येणार नाहीत.
As specified in the consolidated revised guidelines, these shops will not be permitted to open in areas, whether rural or urban, which are declared as containment zones by respective States/ UTs: Ministry of Home Affairs (MHA) https://t.co/SgfcRie8nP
— ANI (@ANI) April 25, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”