कॅन्सरशी झुंज देणाऱ्या आईसाठी तिन्ही मुलांनी केले मुंडण, हृदयस्पर्शी Video Viral

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या देशात कॅन्सर अशी झुंज देणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. रोज या कॅन्सर आजारावर हजारो रुग्ण उपचार घेत असतात. मुख्य म्हणजे, या रुग्णाच्या मागे त्यांच्या फॅमिलीचा मोठा सपोर्ट असतो. कोणत्याही रुग्णांचे मनोबल वाढवण्यामध्ये कुटुंबाची मोठी भूमिका असते. अशाच एका कुटुंबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडिओत एका महिलेवर कॅन्सरमुळे मुंडन करण्याची वेळ येतात तिच्या कुटुंबातील इतर सदस्य देखील आपले मुंडन करून घेताना दिसतात. या कारणामुळे त्या महिलेला आधार मिळतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ गहिवरून टाकणारा आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक कॅन्सर रुग्ण महिलेचे केस कापले जात आहेत. त्यामुळे ती प्रचंड रडत, हतबल झालेली आहे. हे पाहून तिची मुले देखील आपले मुंडन करून घेतात. एक नाही तर तिन्ही मुले आपल्या केसांचे मुंडण करतात हे पाहून महिलेला देखील रडू येते. मात्र या कृतीमुळे महिलेचे मनोबल वाढते आणि तिला तितकाच आनंद देखील होतो. या हृदयस्पर्शी व्हिडिओला अनेकांनी आपल्या अकाउंटवरून शेअर केले आहे. तसेच त्या व्हिडिओवर वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत.

या व्हिडिओला दोन दिवसांपूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या Reddit वर शेअर करण्यात आला आहे. तर या व्हिडिओला लाखोंच्या व्ह्यूज रोज मिळाले आहेत. तसेच, प्रत्येकाकडून या मुलांचे आणि त्या महिलेचे विशेष कौतुक केले जात आहे. दरम्यान, कॅन्सर आजारावर मात करण्यासाठी हजारो रुग्ण रोज उपचार घेत आहेत. त्यांचे या आजाराची झुंज देण्यासाठी मनोबल वाढवणे अत्यंत गरजेचे असते. तसेच डॉक्टरांसोबत कुटुंबाचा देखील त्यांना तितकाच सपोर्ट असणे आणि धीर देणे महत्त्वाचे असते. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओतून आपल्याला हेच दिसून येत आहे.