सातारा कोर्टात सदावर्ते हजर : कोर्ट परिसरात 250 पोलिसांचा बंदोबस्त

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

गुणरत्न सदावर्ते यांना सातारा येथील कोर्टात हजर करण्यात आले असून सुनावणी काही वेळात सुरू होणार आहे. मात्र, साताऱ्यात कोर्ट परिसरात 250 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गोंधळ निर्माण करण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. तर सदावर्ते यांना कोर्टात जेल की बेल हे काही वेळात समजणार असून पुढे कोल्हापूर पोलिस ताबा घेणार का

गुणरत्न सदावर्ते यांना मुंबई येथील अर्थर रोड जेलमधून काल सायंकाळी 5 वाजता सातारा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर वैद्यकीय तपासणी करून रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जेलमध्ये रवानगी करण्यात आली. आज शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सातारा कोर्टात नेले आहे. या कोर्टात सध्या कोणलाही प्रवेश दिला जात नसून 250 पोलिसांचा फाैजफाटा उभा करण्यात आला आहे.

सातारा कोर्ट सदावर्ते यांना जेल की बेल देणार हे काही वेळातच समजणार आहे. कोर्टाने जेल दिल्यास सदावर्ते यांचा सातारा मुक्काम वाढणार आहे तर बेल मिळाल्यास कोल्हापूर येथेही एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे कोल्हापूरचे पोलिस सदावर्ते यांचा ताबा घेणार का याकडे आता लक्ष लागून आहे.