Amarnath Yatra 2023 : दरवर्षी लाखो भाविक अमरनाथ या धार्मिक ठिकाणी भेट देत असतात. अमरनाथ यात्रा ही मोजकेच दिवस सुरु असते. त्यामुळे या ठिकाणी यात्रा सुरु झाल्यानंतर सतत भाविकांची गर्दी पाहायला मिळते. जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रा यावर्षी 62 दिवस चालणार आहे. ही यात्रा यंदा 1 जुलैला चालू झाली असून 31 ऑगस्टला संपणार आहे. या यात्रेसाठी सरकारकडून काही वयोमर्यादा ठरवण्यात आली आहे. ज्यामध्ये 13 ते 70 वयोगटातील भाविकच यात्रेसाठी नोंदणी करू शकतात.
समुद्रसपाटीपासून 3,888 मीटर उंचीवर असलेले शिवलिंग अमरनाथ गुहेतील बर्फापासून नैसर्गिकरित्या तयार झाले आहे. त्यामुळे त्यांना बाबा बर्फानी असेही म्हणतात. यावर्षी सुमारे दीड लाख लोकांनी बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी नोंदणी केली आहे. मात्र, खराब हवामानामुळे यात्राही थांबवण्यात आली होती, पण आता वातावरण स्वच्छ होताच यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली. तुम्हीही बाबा बर्फानीला भेट देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया येथे…
अमरनाथ गुहेत जाण्याचा मार्ग – (Amarnath Yatra 2023)
अमरनाथ गुहा (Amarnath Yatra 2023) देशातील जम्मू-काश्मीर राज्यात आहे. गुहेत जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. अनंतनाग जिल्ह्यातील 36 किमी लांबीचा पहलगाम रस्ता आणि गांदरबल जिल्ह्यातील 14 किमी लांबीचा बालटाल रस्ता. तुम्ही कोणत्याही वाहनाने पहलगाम किंवा बालटालला पोहोचू शकता. यापलीकडे तुम्ही पायी किंवा घोड्यावर बसून प्रवास पूर्ण करू शकता. अमरनाथ यात्रा पहलगाम आणि बालटाल येथूनच सुरू होते. श्रीनगरहून पहलगाम किंवा बालटाल सहज पोहोचता येते.
अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वी या गोष्टी ठेवा लक्षात
1) प्रथम नोंदणी करा : अमरनाथ यात्रेला जाण्यापूर्वी, तुम्हाला अमरनाथ श्राइन बोर्ड (SASB) च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करावी लागेल.
2) वैद्यकीय तपासणी : अमरनाथ यात्रा (Amarnath Yatra 2023) सुरू करण्यापूर्वी तुम्हाला वैद्यकीय तपासणी देखील करावी लागेल. हे देखील महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्ही लांबच्या प्रवासात सुरक्षित राहू शकता आणि आजारी पडण्याची शक्यता कमी आहे.
3) राहण्याची सोय : बेस कॅम्प आणि यात्रा मार्गावर ठिकठिकाणी तंबू, अतिथीगृहे आणि धर्मशाळा पाहायला मिळतील. तुम्ही तुमच्या बजेटनुसार कोणताही पर्याय निवडू शकता.
4) प्रवास किती लांब असेल : यात्रा साधारणपणे जून महिन्यात सुरू होते, परंतु यावेळी ती 1 जुलैपासून सुरू होत असून 31 ऑगस्टला संपेल.