दिवस आणि रात्रीचे विभाजन होणारा अद्भुत नजारा!! Viral Video पाहून व्हाल थक्क

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मनुष्य हा पृथ्वीवर राहतो आणि तो दररोज सकाळ आणि रात्र अशा वेळेत जगतो. पृथ्वीवर राहणाऱ्या मनुष्याला हे माहीत असते की, दिवसांमध्ये 24 तास असतात. ज्यामध्ये सकाळ, दुपार आणि सायंकाळ असते. सगळ्यात शेवटी रात्रीनंतर दुसरा दिवस उगवतो. म्हणजेच, सूर्य उगवतो तेव्हा सकाळ होते आणि चंद्र दिसला की रात्रीला सुरूवात होते. परंतु हे सगळं गणित पृथ्वीवरच झालं. तुम्हाला हे माहित आहे का की, स्पेसमध्ये दिवस आणि रात्रीची कशी विभागणी होते. नसेल माहित तर आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत ज्यामध्ये दिवस आणि रात्रीचे विभाजन होताना दिसेल.

सध्या सोशल मीडियावर स्पेसमध्ये होणाऱ्या दिवस आणि रात्रीच्या विभाजनाचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसत आहे तर काहीजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. या व्हिडिओमध्ये आपल्याला थेट दिवस आणि रात्रीचे विभाजन कसे होते हे दिसत आहे. इंस्टाग्राम अकाउंटवर टर्मिनेटर लाइनचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एस्ट्रोसायन्स या अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखोंच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत. चला तर मग पाहूया या व्हिडिओमध्ये नक्की काय दाखवले आहे.

https://www.instagram.com/p/CxLkN__SkUL/?utm_source=ig_web_button_share_sheet

टर्मिनेटर लाइन

आपण पृथ्वीवर रहात असताना आपल्याला वेळ बदलते तशी दिवस आणि रात्र याचे बदलते रूप पाहायला मिळते. परंतु स्पेसमध्ये असे घडत नाही. स्पेसमध्ये पृथ्वीवर दिवस आणि रात्रीला विभागणाऱ्या लाइनला टर्मिनेटर लाइन असे म्हणले जाते. टर्मिनेटर एक इमेजनरी लाइन असते जी पृथ्वीवर दिवस आणि रात्रीच्या बाउंड्री डिवाइड करते. पृथ्वीच्या रोटेशनच्या हिशोबाने ही लाइन फिरत असते. व्हिडिओमध्ये देखील आपल्याला हेच दिसत आहे. एका बाजूला दिवस आणि एका बाजूला रात्र असा फरक आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे दृश्य आपल्याला पृथ्वीवरील फक्त काहीच ठिकाणी पाहता येते.

सध्या सोशल मीडियावर याच टर्मिनेटर लाईनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. टर्मिनेटर लाइन फोटोग्राफर्स आणि एस्ट्रोनॉमर्सना खूप आवडते. खरं तर हा नजाराच खूप सुंदर दिसतो. यामध्ये आपल्याला एकाच वेळी दिवस आणि रात्र पाहता येते. आणि हे दृश्य सर्वात अद्भुत असतं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला प्रचंड पसंती मिळत आहे.