हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन : ई-कॉमर्स कंपनी amazone चे सर्वेसर्वा असणारे जेफ बेझोस यांनी त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ सोबत Engagement केली असून जेफ बेझोस आणि सांचेझ सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी फ्रान्समध्ये आहेत. बेझोस आणि सांचेझ 2018 पासून एकमेकांना डेटिंग करत असले तरी 2019 मध्ये amazone चे बॉस जेफ बेझोस यांचा त्यांची पहिली पत्नी मॅकेन्झी स्कॉटसोबत घटस्फोट झाला तेव्हा सर्वप्रथम लॉरेन सांचेझ आणि जेफ बेझोस ह्यांच्या नात्याबाबत उलगडा झाला होता.
लग्नाच्या तारखेबाबत अजूनही संभ्रम
उपलब्ध माहिती नुसार पेज सिक्सने ने दिलेल्या एका वृत्तात असे म्हटले आहे कि जरी जेफ बेझोस आणि त्यांची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझ यांच्या संभाव्य लग्नाच्या तारखेचा तपशील आलेला समोर आलेला नसला तरी सांचेझच्या बोटांत दिसलेली 20 कॅरेटची डायमंड रिंग पाहून जेफ बेसॉफ आणि त्यांची मैत्रीण लॉरेन सांचेझ ह्यांनी Engagement केली असल्याच्या अफवांना ऊत आला आहे .
Jeff Bezos ह्याच्या Superyacht मध्ये बसवण्यात आलाय लॉरेन सांचेझचा पुतळा
Amazon चे संस्थापक जेफ बेझोस आणि त्यांची मैत्रीण लॉरेन सांचेझ यांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये $500 दशलक्ष (सुमारे 4145 कोटी रुपये) रुपये किमतीच्या भव्यSuperyacht मधून प्रवेश केला होता . या Superyacht चे नाव Koru असे असून त्याच्या पुढील टोकाला $500 दशलक्ष किमतीचा लाकडी पुतळा बनवला आहे. नौकेच्या पुढील भागातील हा पुतळा जेफ बेझोसची मैत्रिणी लॉरेन सांचेझच्या रूपाशी मेळ खात आहे . त्या लाकडी पुतळ्याच्या गळ्यात नेकलेस घालण्यात आला आहे . जेफ बेझोसची सुपरयाट कोरू ही जगातील सर्वात मोठी नौकानयन नौका आहे. त्याची लांबी 417 फूट आहे. या मेगायाटमध्ये अनेक सुपर कार, सी प्लेन, मोटारसायकल, लहान बोटी आहेत. यॉटमध्ये एक मोठा पूल देखील आहे.
2020 मध्ये बेझोससोबत भारतात आली होती लॉरेन सांचेझ
लॉरेन सांचेझला गेल्या काही वर्षांपासून सतत जेफ बेझोससोबत पाहिले जात आहे. 2020 मध्ये ती जेफ बेझोससोबत भारतात आली होती. सांचेझ हि ब्रॉडकॉस्ट जर्नलिस्ट होती तसेच ती हेलीकॉप्टर पायलट आणि ब्लैक ऑप्स एविएशन कंपनीची फाउंडर आहे. सांचेझने यापूर्वी हॉलिवूड एजंट पॅट्रिक व्हाईटसेलशी लग्न केले होते. या लग्नातून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर जेफ बेझोस आणि मॅकेन्झी यांच्या लग्नाला 25 वर्षे झाली असून त्यांना एक मुलगी आणि 3 मुलगे आहेत.