नवी दिल्ली । लॉकडाउनच्या काळात ऑनलाईन अत्यावश्यक वस्तूंच्या विक्रीला केंद्र सरकारची ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी आहे. Amazon-Flipkart या आघाडीच्या ई-कॉमर्स कंपन्या लॉकडाउनच्या काळात केवळ अत्यावश्यक सामानांची विक्री करत आहे. मात्र, ‘अनावश्यक असल्या तरी अनेक वस्तूंची ग्राहकांना दीर्घकाळापासून गरज असून अशा वस्तूंचीही विक्री करु द्यावी, अशी विनंती Amazon व Flipkart ने केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगचं भान राखून अत्यंत सुरक्षित पद्धतीने आम्ही या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवू’ अशी ग्वाही सुद्धा या दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यानी दिली आहे. तसेच आम्हाला इतर वस्तूंची विक्री करण्यास परवानगी दिल्यास देशात करोना व्हायरसच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासही मदत होईल, असे या कंपन्यांनी म्हटले आहे. एनडीटीव्हीने याबाबत वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिलं आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, “करोना महामारीविरोधातील संयुक्त लढाईत भूमिका निभावण्याची परवानगी द्या”, अशी विनंती अॅमेझॉन इंडियाने सरकारला केली आहे. “ई-कॉमर्सद्वारे सामान वितरित करताना सोशल डिस्टन्सिंगचं भान राखून सर्वात सुरक्षित मार्ग अवलंबला जाईल. नागरिकांच्या सुरक्षेबाबत आम्ही कटीबद्ध आहोत. दीर्घकाळापासून नागरिकांना ज्या सर्व सामानांची आवश्यकता आहे ते पुरवण्याची परवानगी देऊन करोना महामारीविरोधातील या संयुक्त लढ्यामध्ये आम्हालाही आमची भूमिका निभावू द्यावी”, अशी मागणी अॅमेझॉन इंडियाकडून करण्यात आली आहे. तर, फ्लिपकार्टनेही अत्यंत सुरक्षितपणे, सर्व खबरदारी बाळगून लोकांच्या गरजा पूर्ण करु असे म्हटले आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यापासून सरकारने इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनावश्यक वस्तूंच्या विक्रीवर बंदी घातली आहे. केवळ अत्यावश्यक वस्तूंचीच विक्री करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”