नवी दिल्ली । केंद्र सरकारने लॉकडाउन अजून दोन आठवड्यांसाठी वाढवला. लॉकडाउनचा तिसरा टप्पा 4 मे ते 17 मेपर्यंत असेल. या लॉकडाउनबाबतचं एक चांगलं वृत्त म्हणजे, अॅमझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्या अत्यावश्यक नसलेल्या सामानांचीही डिलिव्हरी करु शकणार आहेत. केंद्रानं काही अटींसह यासाठीची परवानगी दिली आहे.
अॅमझॉन आणि फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना अनावश्यक सामानांची डिलिव्हरी करण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. पण, ही परवानगी केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्येच असेल. रेड झोनसाठी अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सामानांचीच डिलिव्हरी केली जाईल.
यानुसार, आता ४ मेपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील लोकं इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन स्मार्टफोन, लॅपटॉप, AC,फ्रिज, कंप्यूटर हार्डवेअर यासारखी अत्यावश्यक नसलेली पण गरजेच्या सर्व वस्तू खरेदी करु शकणार आहेत. याशिवाय ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ओला, उबेरसह खासगी टॅक्सी वाहतुकीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र चालकासह केवळ २ जणांनाच प्रवास करता येईल. खासगी ४ चाकीसाठीही हा नियम कायम असेल.
रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोन काय आहे ?
सरकारने करोना व्हायरसला रोखण्यासाठी देशातील जिल्ह्यांची तीन विभागात विभागणी केली आहे. रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन गटात विभागले आहे. ज्या जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. ते जिल्हे रेड झोनमध्ये ठेवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी १४ दिवसांहून अधिक दिवस करोनाचा संसयीत रुग्ण आढळला नाही. ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये ठेवण्यात आले. तसेच गेल्या २१ दिवसांपासून कोणताही संसर्ग झालेली व्यक्ती आढळली नाही. अशा जिल्ह्यांना ग्रीन झोनमध्ये ठेवण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”