Thursday, February 2, 2023

लॉकडाऊन बळी! घरी चालत निघालेल्या मजुराने अर्ध्या रस्त्यातच गळफास लावून संपवला जीवनप्रवास

- Advertisement -

वर्धा । लॉकडाऊनमुळे हैद्रबादहून घरी चालत निघालेल्या एका स्थलांतरित मजुराने वर्ध्याजवळ पोहचताच शेतातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमरसिंह मडावी असं या मजुराचं नाव आहे. अमरसिंगने हैदराबादवरून चालत ४५० किमी अंतर कापलं होतं. मात्र, नागपूर-वर्धा सीमेवर गिरड येथे पोहोचल्यावर प्रचंड थकवा आणि हताश होत त्याने तिथेच एका शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

गिरड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भर उन्हात सलग चालून त्यांना थकवा आला होता. गुरुवारी पाच वाजण्याच्या सुमारास आम्हाला एका शेतकऱ्याने फोन करुन यासंबंधी माहिती दिली. घटनास्थळी पोहोचलो असता अमरसिंह यांनी टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतला असल्याचं आम्हाला दिसलं. अमरसिंगच्या मृतदेहाची तपासणी केली असता पोलिसांना यावेळी अमरसिंह यांच्या खिशात मोबाइल मिळाला. मोबाइल स्वीच ऑफ असल्याने पोलिसांनी तो चार्ज केला आणि त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला. शवविच्छेदन केल्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह कुटंबाच्या ताब्यात दिला आहे.

- Advertisement -

अमरसिंहचा हैद्राबादवरुन घरच्या दिशेने पायी प्रवास एकूण २० जणांसोबत सुरु झाला होता. दरम्यान रस्त्यात एका ट्रक चालकाने या सर्वांना आपल्यासोबत घेतलं होतं. रस्त्यात जेवणासाठी ट्रक थांबला होता. प्रवास पुन्हा सुरु झाला तेव्हा ट्रक अमरसिंह यांना न घेताच निघून गेला. यामुळे अमरसिंग प्रचंड निराश झाले होते असंही पोलिसांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”