हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऑनलाईन डिजिटल शॉपिंग अॅप अॅमेझॉन मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. अॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस यांनी या मनसेच्या मागणीचा दखल घेतली आहे. डिजिटल सेवेत मराठीच्या समावेशासाठी आज मुंबईत अॅमेझॉनचे एक शिष्टमंडळ दाखल झाले असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहे.
‘अॅमेझॉन’च्या अॅपमध्ये मराठीच्या समावेशाबाबत मनसे नेते अखिल चित्रे यांनी पाठवलेल्या ईमेलला कंपनीने उत्तर दिले. या ईमेलचा स्क्रीनशॉट चित्रे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. “जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अॅमेझॉन अॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिली आहे” असे ‘अॅमेझॉन’च्या वतीने कार्तिक नामक व्यक्तीने लिहिले आहे.
ॲमेझाॅनच्या डिजिटल सेवेत (Trading App) मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची ॲमेझाॅनचे संस्थापक जेफ बेझॉस ह्यांच्या प्रतिनिधींनी घेतली दखल. अमेझॉनचं शिष्टमंडळ आज मुंबईत… राजसाहेब म्हणतात तसं… तुम्ही तुमच्या भाषेवर ठाम असाल तर जग तुमची दखल घेतं. @mnsadhikrut pic.twitter.com/tpPGCCJyDt
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) October 20, 2020
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा मनसेने दिला. यावेळी खिल चित्रे यांनी स्टाफला खडे बोलही सुनावले. जर सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय ठेवला नाही, तर स्टाफला लाथ मारुन बाहेर काढण्याची धमकीही मनसेने दिली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’