‘मनसे’च्या दणक्यापुढे जेफ बेझॉस नरमले ; अ‍ॅमेझॉन अ‍ॅपमध्ये होणार ‘मराठी’ भाषेचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ऑनलाईन डिजिटल शॉपिंग अॅप अ‍ॅमेझॉन मध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. अॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझोस यांनी या मनसेच्या मागणीचा दखल घेतली आहे. डिजिटल सेवेत मराठीच्या समावेशासाठी आज मुंबईत अ‍ॅमेझॉनचे एक शिष्टमंडळ दाखल झाले असून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहे.

‘अ‍ॅमेझॉन’च्या अ‍ॅपमध्ये मराठीच्या समावेशाबाबत मनसे नेते अखिल चित्रे यांनी पाठवलेल्या ईमेलला कंपनीने उत्तर दिले. या ईमेलचा स्क्रीनशॉट चित्रे यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. “जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिली आहे” असे ‘अ‍ॅमेझॉन’च्या वतीने कार्तिक नामक व्यक्तीने लिहिले आहे.

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या अ‍ॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करा, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करु, असा इशारा मनसेने दिला. यावेळी खिल चित्रे यांनी स्टाफला खडे बोलही सुनावले. जर सात दिवसांत मराठी भाषेचा पर्याय ठेवला नाही, तर स्टाफला लाथ मारुन बाहेर काढण्याची धमकीही मनसेने दिली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment