25 नोव्हेंबरपासून सुरू होणार Amazon चा BFCM सेल, 70 हजार भारतीय निर्यातदारांचा सहभाग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या Amazon India ने रविवारी सांगितले की,” ते Black Friday And Cyber Monday Sale दरम्यान जागतिक ग्राहकांना ‘मेड इन इंडिया’ प्रॉडक्ट्स ऑफर करणार आहेत. ज्यासाठी 70 हजाराहून जास्त भारतीय निर्यातदारांनी तयारी केली आहे.

Black Friday And Cyber Monday Sale 29 नोव्हेंबरपर्यंत चालेल
Black Friday And Cyber Monday Sale या महिन्यात 25 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि 29 नोव्हेंबरपर्यंत चालेल. Amazon ने एका निवेदनात म्हटले आहे की,”भारतीय निर्यातदार आगामी सुट्टीच्या हंगामासाठी Amazon च्या जागतिक वेबसाइट्सवर 52,000 हून जास्त नवीन प्रॉडक्ट्स सादर करतील.”

दिग्गज ई-कॉमर्स कंपनीने सांगितले की,”जगभरातील Amazon ग्राहकांना घर आणि स्वयंपाकघर, खेळणी, कपडे, हेल्थ सर्व्हिसेस, ऑफिसशी संबंधित प्रॉडक्ट्स तसेच भारतीय निर्यातदारांनी बनवलेले दागिने आणि फर्निचर यांसारखे प्रॉडक्ट्स खरेदी करता येतील.”

सणासुदीच्या हंगामानंतर BFCM सुरू होते
अभिजित कामरा, डायरेक्टर – ग्लोबल बिझनेस, Amazon India म्हणाले, “BFCM सेलची सुरुवात जागतिक सुट्टीच्या मोसमापासून होईल. ही विक्री भारतात सणासुदीच्या हंगामानंतर होत आहे, जो परंपरेने आमच्या विक्रेत्या भागीदारांसाठी वाढीचा प्रमुख काळ आहे.” ते म्हणाले की,”आम्हाला विश्वास आहे की, 2021 BFCM विक्री आमच्या विक्रेत्यांना निर्यात व्यवसायाला गती देण्यासाठी मदत करेल.”