लग्न ठरलं, साखरपुडा झाला, लग्नाची तयारी सुरु झाली अन् काळाने घात केला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड : हॅलो महाराष्ट्र – बीडमध्ये एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये बीडमधील अंबाजोगाई येथील 26 वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने (heart attack) मृत्यू झाला आहे. यामुळे मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. मृत तरुणाचे नाव धीरज तट असे आहे. बुधवारी सकाळी हि घटना घडली. अवघ्या काही दिवसांनी धीरजचा विवाह होणार होता मात्र त्या अगोदरच नियतीने तिच्यावर घाला घातला. धीरजच्या या अचानक झालेल्या मृत्यूमुळे (heart attack) सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

कुटुंबियांना मोठा धक्का
धीरज हा इंजिनिअर होता. अंबाजोगाई या ठिकाणी त्याने इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले होते. तो पुण्यात एका कंपनीमध्ये काम करत होता. 25 दिवसांनी त्याचं लग्न होणार होतं. घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरु असताना धीरजचा अकाली मृत्यू (heart attack) झाला. यामुळे धीरजच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. 18 डिसेंबर रोजी धीरजचं लग्न होणार होतं. त्याचा साखरपुडा देखील झाला होता.

https://www.facebook.com/laidwar/posts/5438758092908145

काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
एकुलता एक मुलगा ऐन तारुण्यात गमावल्यानं त्याच्या आईवडिलांसह नातलगांना मोठा धक्का (heart attack) बसला. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. धीरज तट या तरुणाच्या मृत्यूमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!