व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीच्या नेत्यांसह मान्यवरांकडून अभिवादन

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगम याठिकाणी आज त्यांच्या स्मृतीस्थळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री, आ. बाळासाहेब पाटील, जेष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, प्रभाकर देशमुख, माजी सभापती देवराज पाटील आदींसह भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. अतुल भोसले आदींसह भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.

कराड येथील प्रीतिसंगम या ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर आज सकाळी यशवंतराव चव्हाण याना अभिवादन केल्यानंतर सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला.या ते म्हणाले की, प्रशासनातून स्थानिक स्वराज्य संस्थांची व पंचायत समितीची निर्मिती, साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतीला प्राधान्य, शिवाजी विद्यापीठ व मराठवाडा विद्यापीठातून शिक्षणाला प्राधान्य देण्याचं चौफेर असे काम आधुनिक महाराष्ट्राचे शिलंकार यशवंतराव चव्हाण यांनी केले आहे.

बाळासाहेब पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांनी महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. पुरोगामी विचारांनी तो पुढे गेला पाहिजे आणि त्याला यांत्रिकीकरण करण्याच्या माध्यमातून पुढे नेले पाहिजे. या यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने राज्याची प्रगती चालू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने आज पुरस्कार सोहळा असल्याने आज शरद पवार आज कराडला आले नसल्याची माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली.

यशवंतराव चव्हाण यांनी राज्याला नवीन दिशा दिली : अतुल भोसले

स्व. यशवंतराव चव्हाण यांनी या महाराष्ट्र राज्याला एक नवी दिशा देण्याचे काम केले. सहकारी संस्थांबरोबर ग्रामीण अर्थव्यवस्था असेल , संस्था असतील याना बळकट करण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले. संयुक्त महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले आहे, असे डॉ. अतुल भोसले यांनी म्हंटले.