आंबनेळी घाट उद्या वाहतूकीस बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके
पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गाला जोडणारा आंबेनळी घाट रस्ता उद्या (दि.4) बुधवारी दिवसभर बंद राहणार आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे या मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. सदरील रस्त्याचे दुरूस्ती काम करण्यासाठी दिवसभर पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.

आंबेनळी घाट रस्ता रा. मा. – 139 (भाग- पार फाटा ते मेटतळे) दुरुस्तीच्या अनुषंगाने रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. जुलै – 2021 मध्ये झालेल्या अतिवृष्टिमध्ये सदर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे तसेच नदीपात्रातून व ओढ्यातून मोठ्या प्रमाणात दगड माती रस्त्यावर येवून ठिकठिकाणी रेस्त्यावरील मोऱ्यांची व रस्त्याचे नुकसान झालेले होते. सदर ठिकाणी सध्या दुरूस्तीचे कामे प्रगतीत आहे.

सदर रस्त्याच्या दुरूस्तीच्या कामा अनुषंगाने रस्ता खोदून पाईप टाकणेकरिता दि. 4/01/2023 रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे बंद करण्यात येणार आहे. वाहन चालकांना उद्या या मार्गावरून जाता येणार नाही. त्यामुळे प्रवासासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.