ऐकावे ते नवलंच ! चक्क नवऱ्याला घटस्फोट देत सासऱ्यासोबत थाटला संसार

couple
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रेम, लग्न आणि घटस्फोट या गोष्टी आजकाल नॉर्मल आहेत. आजकाल तरुण पिढी एकमेकांच्या प्रेमात पडते आणि लग्न करते. लग्नानंतर काही वैचारिक मतभेदांमुळे ती घटस्फोट घेऊन विभक्त देखील होते. अशाच एका विभक्त झालेल्या जोडप्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या प्रकरणात एका महिलेने पतीसोबत विभक्त होत चक्क सासऱ्यांसोबत नवा संसार थाटला आहे. त्यामुळे सध्या सगळीकडे या लग्नाची जोरदार रंगली आहे.

काय आहे सविस्तर प्रकरण
अमेरिकेत राहणाऱ्या एरिका किगल आणि जस्टिन टावल या जोडप्याचा २०११ मध्ये घटस्फोट झाला होता. त्यांना एक मुलगीसुद्धा आहे. या घटस्फोटानंतर एरिकाने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेत तिने तिच्या सासऱ्यांसोबत म्हणजे जस्टिनच्या वडिलांसोबतच दुसरं लग्न केले आहे. जस्टिनचे वडील ६० वर्षांचे आहेत तर एरिका ३१ वर्षांची आहे. एरिका आणि जस्टिन हे १९ वर्षांचे असताना त्यांचे लग्न झाले होते. परंतु त्यांचा संसार फार काळ टिकू शकला नाही.

एरिकाचा जेव्हा आपला पती जस्टिनसोबत घटस्फोट झाला तेव्हा ती आपल्या सासऱ्याच्या म्हणजेच जेफच्या प्रेमात पडली. एवढेच नाही तर जेफनेसुद्धा एरिकावर प्रेम असल्याचे कबुल केले आहे. त्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये लग्न केले. सध्या जेफ आणि एरिकाला २ वर्षांची लहान मुलगीसुद्धा आहे. एरिका १६ वर्षाची असल्यापासून जेफला ओळखते. यामुळे जेफ एक परफेक्ट नवरा असल्याचे तिचे मत आहे. एरिकाने जस्टिनसोबत घटस्फोट घेतल्यानंतर तिने मुलीची कस्टडी जस्टिनकडे दिली आहे. या घटस्फोटानंतर जस्टिनने देखील दुसरे लग्न केले आहे.