हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले होते. दोन्ही नेते एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान आपापसात भिडले होते. यावेळी त्यांनी एकमेकांची अक्कल काढली होती त्यानंतर अमेय खोपकर यांनी ट्विट करत मिटकरी यांच्यावर निशाणा साधला अन् अमोल मिटकरी यांनी देखील खोपकरांवर पलटवार केला.
मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर यांनी तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत, असं ट्विटद्वारे म्हटलंय.
तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 22, 2022
यानंतर अमोल मिटकरी यांनी देखील ट्विट करत खोपकर यांना प्रत्युत्तर दिले. माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही”, अशा शब्दात अमेय खोपकर यांचं नाव न घेता मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे l
कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही ll— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 22, 2022
वाद कुठून सुरु झाला?
राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवजयंती तारखेनुसार साजरी व्हावी, असं म्हटलंय. “तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यामागे राजकारण आहे”, असंही मिटकरी म्हणालेत. तर, “मिटकरी फालतू राजकारण करू नका. तुम्हाला नेहमीच फालतू राजकारण करायची सवय आहे. प्रसिद्धीसाठी काहीही बडबड करता. अक्कल आहे का तुम्हाला? कुठल्या गोष्टीचे राजकारण करता, याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला.” असे अमेय खोपकर यांनी म्हंटले.