अविस्मरणीय ‘वास्तव’!अमेय खोपकरांनी शेअर केली देढफुट्या आणि रघुभाईच्या पहिल्या भेटीची आठवण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘वास्तव’ हा चित्रपट १९९८ साली प्रदर्शित झाला होता. आज जवळ जवळ त्याला २२ वर्ष उलटून गेली आहेत. मात्र आजही वास्तव चित्रपटाची छाप कायम आहे. या चित्रपटात अभिनेता संजय दत्त मुख्य भूमिकेत होता तर अभिनेता संजय नार्वेकर देढफुट्या या भूमिकेत दिसला होता. संजय नार्वेकरने साकारलेल्या देढफुट्या प्रेक्षकांना इतका आवडला होता कि बस रे बस्स. त्याहूनही अधिक रघूभाई आणि देढफुट्याची केमिस्ट्री बॉलिवूडवर कमालीची जादू करून गेली. नुकताच अमेय खोपकर यांनी साठवणीतील एक आठवण प्रेक्षकांसह शेअर केली आहे. त्यांनी रघुभाई आणि देढफुट्याच्या पहिल्या भेटीचा एक दुर्मिळ फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

https://www.facebook.com/ameya.khopkar/posts/10160990452830550

अमेय खोकर यांनी शेअर केलेला हा फोटो वास्तव चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीसचा आहे. हा फोटो पाहिल्यानंतर प्रेक्षकांना अगदी वास्तवच्या काळात गेल्यासारखेच वाटेल असा हा क्षण आहे. सध्या सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड वेगाने तुफान वायरल होताना दिसत आहे. या एकाच फोटोमध्ये प्रेक्षकांचे लाडके असे दोन दोन सुपरस्टार अभिनेते दिसत आहेत. एक मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत गाजलेला लोकप्रिय अवलिया अभिनेता संजय नार्वेकर आणि दुसरा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सुपरस्टार संजूभाई अर्थात संजय दत्त. यामुळे हा फोटो सोशल मीडियावर अतिशय चर्चेत आहे.

https://www.instagram.com/p/CLePgLnn23p/?utm_source=ig_web_copy_link

वास्तव चित्रपटातील अभिनेता संजय दत्तची रघुभाई हि मुख्य भूमिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. तर अभिनेता संजय नार्वेकरने साकारलेली देढफुट्याची भूमिकादेखील प्रचंड गाजली असून आजही लोकांच्या लक्षात आहे. या दोनही भूमिका प्रेक्षकांना अतिशय आवडल्या होत्या. खरंतर या भूमिकेने संजय नार्वेकरला बॉलिवूड जगतात एक अनोखी ओळख करून दिली. अमेय खोपकर यांनी हा वास्तव चित्रपटातील दोन सुपस्टार संजय यांचा फोटो शेअर करताना लिहिले कि, माझा जिवलग मित्र संजय नार्वेकरच्या आयुष्यातली अविस्मरणीय भूमिका ‘देढफुट्या’. ‘वास्तव’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोन संजय पहिल्यांदा आमने-सामने आले तो दुर्मिळ क्षण. १९९८ला याच दिवशी झाली होती ही भेट.

Leave a Comment