‘या’ दिवशी प्रदर्शित होणार अमीर खानचा चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु आमिरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आता या चित्रपटासाठी प्रेक्षकांना पुढील वर्षापर्यंत थांबावे लागेल.चित्रपट निर्मात्यांनी याची घोषणा केली आहे. चित्रपटाची समीक्षक तरण आदर्श यांनी सोशलवर चित्रपटाची नवीन रिलीज डेट जाहीर केली आहे. खरं तर लालसिंग चड्ढा’ हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने रिलीज होणार होता, परंतु आता तुम्हाला त्यासाठी अजून एक वर्ष प्रतीक्षा करावी लागेल.

पुढच्या वर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आमिरचा हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ नये, असे या चित्रपटाच्या निर्मात्यांना वाटत नाही, म्हणूनच ‘लालसिंग चड्ढा’ ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ हा 1994 मध्ये आलेल्या ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे.अद्वैत चंदन यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. तर आमिर खान आणि त्यांची पत्नी किरण राव चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटात अमीर खान सोबत करीना कपूरही आहे. याआधी त्यानी ‘थ्री इडियट्स’ आणि ‘तलाश’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

You might also like