आयुष्मान CAPF योजनेचा शुभारंभ, 10 लाख जवानांना होणार फायदा; अमित शहांची मोठी घोषणा

0
41
Amit Shah
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुवाहाटीमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांसाठी (CAPF) आयुष्मान सीएपीएफ योजनेची (Ayushman CAPF Healthcare Scheme) घोषणा केली आहे. आयुष्मान सीएपीएफ योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून केंद्रीय आरोग्य विमा कार्यक्रमांचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून जवळपास 10 लाख केंद्रीय सैन्य दलाच्या जवानांना आणि त्यांच्या कुटुंबियांना याचा मोठा फायदा होणार आहे.

आयुष्मान सीएपीएफ योजनेअंतर्गत 10 लाख केंद्रीय सैन्य दलाच्या जवानांना, अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या 50 लाख कुटुंबीयांनाही देशातील 24 हजार रुग्णालयांमध्ये उपचार मिळू शकणार आहेत तसेच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ‘आयुष्मान सीएपीएफ योजना सुरू करण्यासाठी सीएपीएफच्या सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा आजचा चांगला दिवस आहे. ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ अशी घोषणा देऊन त्यांनी तरुणांमध्ये जोश भरला होता’ असं अमित शहा यांनी म्हटलं आहे.

कोरोनाविरूद्धच्या लढाईत सीएपीएफचे जवान आघाडीवर उभे होते. यावेळी अनेक जवानांना करोनाचा संसर्ग झाला. अनेकांनी आपला जीवही गमावला. या लढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या सर्व जवानांचं अभिनंदन करतो. या योजनेतून सीएपीएफच्या जवानांना उपचारासाठी हॉस्पिटल्समध्ये फक्त कार्ड स्वॅप करावं लागेल, अशी माहिती शहांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here