हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. आणि या निवडणुकीच्या आधी सगळ्या पक्षांकडून आश्वासनांचा पाऊस पडताना दिसत आहे. अशातच आता भाजप पक्षाचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी पक्षाचा जाहीरनामा जाहीर प्रसिद्ध केलेला आहे. या जाहीरनाम्यात पुढील पाच वर्षात राज्यात कसे चित्र असणार आहे? या सगळ्याची माहिती दिलेली आहे. तसेच मतदारांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा देखील या जाहीरनाम्यात केलेल्या आहेत. आता या जाहीरनाम्यात नक्की कोणत्या सूचना दिलेल्या आहेत? ते आपण जाणून घेणार आहोत.
भाजपच्या जाहीरनाम्यात काय काय?
- आमच्या यांनी दिलेल्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना आता दर महिन्याला 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येणार आहे. तसेच महिलांमध्ये साक्षरता निर्माण करण्यासाठी तसेच महिला सुरक्षिततेसाठी 2500 महिलांचा पोलीस दलात समावेश केला जाणार आहे.
- शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच शेतकरी सन्मान योजनेतून दर वर्षाला 12000 ऐवजी 15000 रुपये देण्यात येणार आहे.
- राज्यातील गरीब आणि गरजू लोकांना अन्न आणि निवारा देण्यात येणार आहे.
- वृद्ध पेन्शन धारकांना दर महिन्याला दीड हजार रुपयांवरून 2100 रुपये देण्यात येणार आहे. जेणेकरून महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षा देखील मिळणार आहे.
- त्याचप्रमाणे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्यात येणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये 25 लाख रोजगार निर्मिती होणार आहे. आणि दर महिन्याला दहा लाख विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये विद्या वेतन देण्यात येणार आहे.
- राज्यातील ग्रामीण भागांमध्ये जवळपास 45000 गावांमध्ये पांधण रस्ते बांधण्यात येणार आहे.
- अंगणवाडी आणि आशा सेविकांचे आर्थिक सुरक्षा आणि कल्याण या सगळ्याचा विचार करून त्यांना दर महिन्याला 15 हजार रुपये आणि विमा संरक्षण देण्याचे देखील जाहीर केलेले आहे.
- वीज बिलामध्ये 30% कपात केली जाणार आहे आणि सौर आणि अक्षय उर्जेवर जास्तीत जास्त भर दिला जाणार आहे.
- 2018 पर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष देखील त्यांनी समोर ठेवलेले आहे.
- मेक इन महाराष्ट्र धोरण राबवून महाराष्ट्राचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून असलेली स्थान मजबूत करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.
- राज्यातील जागतिक फिलटेक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता राजधानी बनवण्यात येणार आहे.
- नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, आहिल्या नगर आणि नाशिकला आधुनिक ॲरोनॉटिकल आणि स्पेस उत्पादक केंद्र बनवून प्रगत एरोस्पेस तंत्रज्ञान आणि उत्पादक हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे.
- शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांवरील संपूर्ण राज्य वस्तू व सेवा कर अनुदानाच्या स्वरूपात शेतकऱ्यांना परत दिले जाणार आहेत.
- सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मागणी केलेली कागदपत्रे आरोग्य नोंदणी ओळखपत्र पेन्शन संबंधित कागदपत्रे थेट त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
- सरकारी रुग्णालयांमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण कक्ष सुरू केले जाणार.
- बळजबरीने तसेच फसवून केलेल्या धर्मांतराविरुद्ध कायदा करण्यात येणार आहे.