शिवसेनेचे फुटलेले आमदार एकनाथ शिंदेंसोबत घेणार अमित शहांची भेट?

0
254
Amit Shah Eknath Shinde 01
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर ठाकरे सरकारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कारण शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल आहेत. दरम्यान त्यांच्यासह वीसहून अधिक आमदार असून ते गुजरातमध्ये आहेत. दरम्यान ते आज केंद्रीयगृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह संबंधित आमदार भाजमध्ये प्रवेश करणार का? हे पहावे लागणार आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी सायंकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतरपासूनच एकनाथ शिंदे पक्षाच्या संपर्कात नसल्याने अनेक प्रकारच्या चर्चा केल्या जाउ लागल्या आहेत. दरम्यान शिंदे हे आपल्या आमदारांसह गुजरातमधील एका हॉटेलमध्ये आहेत. शिंदे हे आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीरही करणार आहेत.

दरम्यान, आज शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह मंत्री अमित शहा यांच्यासोबत त्याची भेट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षासह राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

‘हे’ आमदार आहेत शिंदेंसोबत

शहाजी बापू पाटील, महेश शिंदे सातारा, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश थोरवे, विश्वनाथ भोईर, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदयसिंह राजपूत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार इत्यादी आमदार सोबत आहे.

एकनाथ शिंदेंची फेसबुक पोस्ट

एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यानंतर त्यांनी पहिली फेसबुक पोस्ट लिहिली आहे. “योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग.”, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here