२३ मे रोजीच कळेल, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? – अमित शहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रियंका गांधींवर पलटवार केला आहे. प्रियंका गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अहंकारी सोबत दुर्योधनाची उपमा दिली होती. त्यावरुनच, शहा यांनी प्रियंका गांधींना लक्ष्य केले. प्रियंकाजी ही लोकशाही आहे. तुम्ही म्हटलं म्हणून कुणीही दुर्योधन होत नाही. त्यामुळे, 23 मे रोजीच कळेल, कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन? असे अमित शहांनी म्हटले आहे.
भाजपा अध्यक्ष अमित शहांनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी सभा घेतली. त्यावेळी बोलताना, शहा यांनी प्रियंका गांधींना लक्ष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत टीका केली होती. या टीकेचा काँग्रेसकडून समाचार घेतला जात आहे. देशपातळीवरील काँग्रेस नेते मोदींच्या टीकेला उत्तर देत आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदींना अहंकारी म्हटले आहे. तसेच, राष्ट्रकवी रामधारीसिंह दिनकर यांच्या कवितेच्या माध्यमातून प्रियंका यांनी मोदींवर टीका केली.

हरयाणा येथील प्रियंका गांधींच्या या सभेचा अमित शहांनी पश्चिम बंगालमधील रॅलीत समाचार घेतला. देशात लोकशाही आहे, त्यामुळे प्रियंकाजी तुमच्या म्हणण्यानुसार कुणीही दुर्योधन होणार नाही. 23 मे रोजी कोण दुर्योधन आणि कोण अर्जुन हे आपल्याला दिसून येईल, असे म्हणत शहा यांनी प्रियंका गांधींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.