Monday, January 30, 2023

अमित शहांच्या मुलाची संपत्तीही भरमसाठ वाढलीय, त्याची चौकशी का होत नाही? नाना पटोलेंचा सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्राकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांच्या मागे ईडीची ससेमिरा लावली आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि आता तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी भाजपक8केली जात आहे. त्यावर भाष्य करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शहांच्या मुलाची संपत्तीही भरमसाठ वाढलीय, त्याची चौकशी का होत नाही? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.

विरोधी पक्षांमध्ये भीती निर्माण व्हावी यासाठीच ईडी आणि सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजप करत आहे. त्यांच्या दहपशाहीला आम्ही भीत नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  यांच्या मुलाची संपत्तीही भरमसाठ वाढली आहे, त्याची चौकशी ईडी (ED) का करत नाही?,’ असा थेट सवाल नाना पटोले यांनी केला.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले, जो भाजपमध्ये प्रवेश करतो, त्याची सर्व पापं धुतली जातात आणि जे विरोधी पक्षात आहेत, त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला जातो, हे लोकशाहीसाठी घातक आहे, असं ते म्हणाले.